महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2024 चा निकाल दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे.
मुलाखतींचे वेळापत्रक
निकालावर आधारित दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या मुलाखती खालील तारखांना आयोजित केल्या आहेत:
३० सप्टेंबर २०२५
१ ऑक्टोबर २०२५
३ ऑक्टोबर २०२५
स्थळ: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय,
११ वा मजला, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट क्र. ३४,
सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई
लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांची यादी आणि नेमक्या तारखा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मुलाखतीसाठी महत्वाच्या सूचना
- मुलाखतीच्या दिवशी वैद्यकीय मंडळाकडून प्रमाणित वैद्यकीय तपासणी पत्र अनिवार्यपणे सादर करणे आवश्यक
- अर्जात केलेल्या दाव्यानुसार सर्व मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक
- कोणतेही कागदपत्र न सादर केल्यास मुलाखत घेतली जाणार नाही
- मुदतवाढ दिली जाणार नाही
मुलाखतपत्र
संबंधित उमेदवारांना मुलाखतपत्र त्यांच्या MPSC प्रोफाइलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.







