नोकरी टाइम्स ग्रूप जॉईन करा

Arogya Vibhag Bharti 2026: आरोग्य विभागात मोठी भरती!

On: February 21, 2026 3:41 PM
Follow Us:

Maharashtra Health Department Recruitment 2026: राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे आरोग्य विभागात होणाऱ्या नवीन पदभरतीमध्ये उमेदवारांना प्रथम आदिवासी आणि दुर्गम भागात नियुक्ती दिली जाणार आहे. तसेच, लवकरच १४४० ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची मेगा भरती (Arogya Vibhag Bharti 2026) राबविली जाणार आहे. या भरतीची सविस्तर माहिती आणि शासनाचे नवीन निर्णय खालीलप्रमाणे पाहूया.

▌नव्या पदभरतीत आदिवासी व दुर्गम भागाला प्राधान्य

राज्यातील दुर्गम व आदिवासी भागात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासते. ही अडचण दूर करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार शासनाने नवीन नियम लागू केला आहे:

  • प्रथम नियुक्ती दुर्गम भागात: यापुढे नवीन पदभरतीत निवड झालेल्या तसेच सेवांतर्गत पदव्युत्तर (PG) शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांना पहिली नियुक्ती आदिवासी व दुर्गम भागात दिली जाईल.
  • त्यानंतरच इतर भागात संधी: आदिवासी भागातील रिक्त पदे भरल्यानंतरच उर्वरित बिगर आदिवासी भागात पदभरती केली जाईल.
  • विद्यमान अधिकाऱ्यांनाही सक्ती: जे आरोग्य अधिकारी सध्या बिगर आदिवासी भागात काम करत आहेत, त्यांनाही आता काही काळ आदिवासी भागात सेवा देणे बंधनकारक असणार आहे.

▌शहरी भागासाठी ‘वैद्यकीय आरोग्य अधिकारी’ पदनिर्मिती

ग्रामीण भागासोबतच शहरी आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये ‘वैद्यकीय आरोग्य अधिकारी (गट-अ)’ हे नवीन पद टप्प्याटप्प्याने निर्माण केले जाणार आहे. यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून, लवकरच या पदांच्या भरतीलाही हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

▌५,००० पदांच्या भरतीचे काय झाले? विद्यार्थ्यांमध्ये संताप!

काही महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून आरोग्य विभागात सुमारे ५,००० रिक्त पदांची मोठी भरती करण्याची घोषणा झाली होती. “भरतीची फाईल अंतिम टप्प्यात आहे”, “अर्थ विभागाची मान्यता येणे बाकी आहे”, अशी उत्तरे वारंवार दिली जात आहेत. मात्र, वर्ष संपत आले तरी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

▌Arogya Vibhag Medical Officer Bharti 2026 (१४४० पदे)

एकिकडे ५००० पदांची प्रतीक्षा असतानाच, सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘वैद्यकीय अधिकारी (गट-अ)’ पदांच्या एकूण १४४० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्याचे संकेत दिले आहेत.

भरतीचा तपशीलमाहिती
विभागाचे नावसार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी (Medical Officer – Group A)
एकूण रिक्त पदे१४४० पदे
शैक्षणिक पात्रताएम.बी.बी.एस (MBBS) किंवा बी.ए.एम.एस (BAMS)
पगार (वेतनश्रेणी)₹ ५६,१००/- ते ₹ १,७७,५००/- (दरमहा)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)
अधिकृत वेबसाईटarogya.maharashtra.gov.in
अर्जाची शेवटची तारीखलवकरच जाहीर होईल!

महत्त्वाची सूचना: या १४४० वैद्यकीय अधिकारी पदांची सविस्तर अधिकृत जाहिरात (PDF) लवकरच पोर्टलवर उपलब्ध होईल. जाहिरात येताच सर्वात आधी NokariTimes.in वर अपडेट दिली जाईल.

नोकरी टाइम्स

डॉ. अमर नागरे हे एक अनुभवी शिक्षणतज्ज्ञ आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आहेत. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरीच्या संधी आणि करिअर मार्गदर्शन या विषयात त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्रातील तरुण पिढीला रोजगाराच्या अचूक आणि वेळेवर संधी मिळाव्यात, या उद्देशाने त्यांनी nokaritimes.in या पोर्टलची स्थापना केली आहे. त्यांच्या लेखणीतून हजारो विद्यार्थ्यांना नोकरीविषयक अपडेट्स आणि करिअरच्या नव्या वाटा शोधण्यात मदत होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नोकरी जाहिरात

rto

RTO अधिकारी व्हायचंय? राज्य परिवहन विभागात लवकरच सुरु होणार ४६१ पदांची मोठी भरती; आजच जाणून घ्या संपूर्ण माहिती!

खुशखबर! जलसंपदा विभागात १४ हजार जागांसाठी बंपर भरती; कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका!

परभणी महानगरपालिका मोठी भरती! ५५ जागांसाठी अर्ज सुरू; तर महापालिकेत ११९ पदे रिक्त!

SBI CBO Bharti 2026: स्टेट बँकेत २२७३ पदांची मेगा भरती! पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्जाला मिळाली मुदतवाढ!

GMC Dharashiv Bharti 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे १७ जागांसाठी भरती; २ लाखांपर्यंत मानधन!

RBI Assistant Bharti 2026: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ६५० पदांची मेगा भरती! पदवीधरांना सुवर्णसंधी

Leave a Comment